भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्याजिलें भेटवी आणूनि वासना । दाविल्याचे जना काय काज

tyajilen bhetavi anuni vasana | davilyache jana kay kaj

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
त्याजिलें भेटवी आणूनि वासना । दाविल्याचे जना काय काज ॥१॥ आळवावें देवा भाकूनि करुणा । आपुलिया मना साक्ष करीं ॥ध्रु.॥ नाहीं जावें यावें दुरूनि लागत । आहे साक्षभूत अंतरींचा ॥२॥ तुका म्हणे हा आहे कृपासिंधु । तोडी भवबंधु तात्काळिक ॥३॥