भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्यागें भोग माझ्या येतील अंतरा । मग मी दातारा काय करूं

tyagen bhog majhya yetil antara | mag mi datara kay karun

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
त्यागें भोग माझ्या येतील अंतरा । मग मी दातारा काय करूं ॥१॥ आतां असो तुझे पायीं हें मोटळें । इंद्रियें सकळें काया मन ॥ध्रु.॥ सांडीमांडी विधिनिषेधाचा ठाव । न कळतां भाव जाइल वांयां ॥२॥ तुका म्हणे आतां नको उजगरा । लपवीं दातारा अंगीं मज ॥३॥