भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्याग तंव मज न वजतां केला । कांहीं च विठ्ठला मनांतूनि

tyag tanv maj na vajatan kela | kanhin cha viththala manantuni

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
त्याग तंव मज न वजतां केला । कांहीं च विठ्ठला मनांतूनि ॥१॥ भागलिया आला उबग सहज । न धरितां काज जालें मनीं ॥ध्रु.॥ देह जड जालें ॠणाच्या आभारें । केलें संवसारें कासावीस ॥२॥ तुका म्हणे गेला आळसकिळस । अकर्तव्य दोष निवारिले ॥३॥