भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्वचेचिया रानां धाडूं नको मना

tvachechiya ranan dhadun nako mana

त्वचेचिया रानां धाडूं नको मना ॥ तेयें नंदाचा कान्हा डोळा घाली गो आइयो ॥१॥ गाईचा गोंवळा यमुनेचा पावळा । धरी माझा अचुळा मग मी पळालिये गो ॥२॥ ताकपिरी गोंवळी केली मजसी रांडोळी । भावे नारली मग मी पळालिये गो ॥२॥ गळा गुंजमाळा गांठी । डांगा मोरविसा वेठी । सोकरु लागे पाठी । नंदरायाचा गो आई ये ॥३॥ एक्या करें धरी । विजा करें वेटारी । चुंबन दे हरी । मग मी पळालिये गो ॥४॥ ऐसी पळत पळत गेलिये । कान्होनें मोहिलिये । माझी मीचि जालिये । मग मी समोखिलिये गो ॥५॥ तुना चार । लागतेगोर । तुना बोर लागतो गोर । तुना बाही माझी चार । माझी आईयो गो गो ॥६॥ पूर्वपुण्य फ़ळलें । देह मुक्त जाले । बापरखुमादेविवर विठ्ठलें । ऐसें केलें गो आईयो ॥७॥