भजनी मालिका
← भजनांकडे परत

तूर्या तें महाकारण नाहीं नाहीं जेथें

turya ten mahakaran nahin nahin jethen

तूर्या तें महाकारण नाहीं नाहीं जेथें । दर्शनाचे मतें माझा मीच ॥१॥ गोल्हाट त्रिकूट श्रीहाटातीत । महाकारणाची मात जेथ नाहीं ॥२॥ क्षर अक्षर अनाक्षर नाहीं । कूटस्थ सर्वही प्रसवला ॥३॥ ज्ञानदेव म्हणे ऐसें हें पाहातां । निवृत्तीनें तत्त्वता कथनी केली ॥४॥