भजनी मालिका
← भजनांकडे परत

तूं विटेवरी सखये बाई हो करी कृपा

tun vitevari sakhaye bai ho kari krupa

तूं विटेवरी सखये बाई हो करी कृपा । माझें मन लागो तुझ्या पायीं हो करी कृपा । तूं सावळे सुंदरी हो करी कृपा । लावण्य मनोहरी हो करी कृपा । निजभक्ता करुणा करी हो करी कृपा ॥१॥ पंढरपुरीं राहिली । डोळा पाहिली । संतें देखिली । वरुनी विठाई वरुनी विठाई । सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा । उजळकुळ दीपा । बोध करी सोपा । येउनी लवलाही येउनी लवलाही ॥ध्रु०॥ तुझा देव्हारा मांडिला हो करी कृपा । चौक आसनीं कळस ठेविला हो करी कृपा । प्रेम चांदवा वर दिधला हो करी कृपा । ज्ञान गादी दिली बैसावया हो करी क्रृपा । काम क्रोध मदमत्सर दंभ अहंकार । त्याचे बळ फार । सर्व सुख देई सर्व सुख देई ॥२॥ शुक सनकादिक गोंधळी हो करी कृपा । नाचताती प्रेम कल्लोळीहो करी कृपा । उदे उदे शब्द आरोळी हो करी कृपा । पुढें पुंडलिक दिवटा हो करी कृपा । त्याने मार्ग दाविला निटा हो करी कृपा । आई दाविली मूळपीठा हो करी कृपा । बापरखुमादेवीवरु । सुख सागरु । त्याला नमस्कारु । सर्व सुख देई सर्व सुख देई ॥३॥