भजनी मालिका
← भजनांकडे परत

तूं विष्णु म्हणोन हें जगचि केवळ

tun vishnu mhanon hen jagachi keval

तूं विष्णु म्हणोन हें जगचि केवळ । येर सकळीक मजशीं सहोदर । तेणें कारणें गोत्रेंसि सेकोपजिवीं आम्हां न संडवे कोडें रया ॥ माहेरा वाचूनि आन कांही नेंणें । माहेर तें उपजवी तरंगाचें जीवन । तोय वरी सामावे वेगळालें असिजेल केविं रया ॥१॥ उदरीं सिनार घरदारीं सिनार । सिनार दृश्य द्रष्टा ॥ करी त्या मायबापाचेनि उद्वेगें ॥ मी तो सांगोनियां आलों तुझिया पोटा रया ॥२॥ अंगे ब्रह्म झाला तें तुवां वो जाणितलें । परि तो अविद्ये घायतळीं सुदला ॥ ते तूं मजलागीं नेणसीच माउलिये आपुठे पान्हाये वाढविलें रया ॥३॥ तंवचि मी जालों परि उदर न भेदित जननी । जोडलेना वाटी चक्षु पक्ष निघाले मज तुझाचि वाहाणीं । म्हणोनि सामावलों तुझ्या पोटीं रया ॥४॥ ऐशापरि तुम्हा सम सरिसा जालों । परि तो नामें वोळखिजे ॥ मी तो बाळ कीं मी तो वृध्द ऐसें । अनत्रअन्यपणें लोक कीजे रया ॥५॥ चेवो तरि स्वप्न स्वप्न तरि चेवो माय पुता नेणें ऐसें माझें तुझें । आपलें आपण म्हणतां लाजिजे नमो नमो तुज व्याली वांझ रया ॥६॥ आयुवित भव विभव जगीं जिवांनिडळीं लिहिलें । अलग्न तें मज नेणतया अजंगमा लागुनि पुसोनि घातलें मूळ सानु रया ॥७॥ दृष्टिभेणें रुपा नये काळा भेणें नामाची सोय सांडियेली । तुझ्या रुपीं सर्व रुप रुपस होउनिया दिठी उतरलीया परि रया ॥८॥ आपुलें वित्त आपणा देखतांचि शंकिजे त्याविभागाची केउती परि । बापरखुमादेवीवरा विठ्ठला तूं येक सचराचरीं रया ॥९॥