भजनी मालिका
← भजनांकडे परत

तूं माउलीहून मयाळ चंद्राहूनि शीतळ । पाणियाहूनि पातळ कल्लोळ प्रेमाचा

tun maulihun mayal chandrahuni shital | paniyahuni patal kallol premacha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तूं माउलीहून मयाळ चंद्राहूनि शीतळ । पाणियाहूनि पातळ कल्लोळ प्रेमाचा ॥१॥ देऊं काशाची उपमा दुजी तुज पुरुषोत्तमा । ओंवाळूनि नामा तुझ्या वरूनि टाकिलों ॥ध्रु.॥ तुवां केलें रे अमृता गोड त्या ही तूं परता । पांचां त्तवांचा जनिता सकळ सत्तानायक ॥२॥ कांहीं न बोलोनि आतां उगा च चरणीं ठेवितों माथा । तुका म्हणे पंढरिनाथा क्षमा करीं अपराध ॥३॥