भजनी मालिका
← भजनांकडे परत

तूं माझा स्वामी मी तुझा रंक

tun majha svami mi tujha rank

तूं माझा स्वामी मी तुझा रंक । पाहतां न दिसे वेगळिक ॥१॥ मी तूं पण जाऊंदे दुरी । एकचि घोंगडें पांघरु हरी ॥२॥ रखुमादेविवरा विठ्ठलराया । लागेन मीं पाया वेळोवेळां ॥३॥