भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्हीं वाढविलें तुम्हीं पोसियेलें । तुम्हींच दाविलें जग मज

tumhin vadhavilen tumhin posiyelen | tumhinch davilen jag maj

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
तुम्हीं वाढविलें तुम्हीं पोसियेलें । तुम्हींच दाविलें जग मज ॥१॥ तुमचा प्रकार तुमचा तुम्ही जाणा । आमुचिया खुणा जाणों आम्हीं ॥२॥ तुम्हांसी तों भीड कासयाची देवा । हेचि केशवा सांगा मज ॥३॥ चोखा म्हणे काय बोलूं येयावरी । माझा तूं कैवारी देवराया ॥४॥