भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्हीं जावें निजमंदिरा । आम्ही जातों आपुल्या घरा

tumhin javen nijamandira | amhi jaton apulya ghara

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुम्हीं जावें निजमंदिरा । आम्ही जातों आपुल्या घरा ॥१॥ विठोबा लोभ असों देई । आम्ही असों तुमचें पाई ॥ध्रु.॥ चित्त करी सेवा । आम्ही जातों आपुल्या गावां ॥२॥ तुका म्हणे दिशा भुलों । फिरोन पायापाशीं आलों ॥३॥