भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्ही येथें पाठविला धरणेकरी । त्याची जाली परी आइका ते

tumhi yethen pathavila dharanekari | tyachi jali pari aika te

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुम्ही येथें पाठविला धरणेकरी । त्याची जाली परी आइका ते ॥१॥ आतां काय पुढें वाढवुनि विस्तार । जाला समाचार आइका तो ॥ध्रु.॥ देवाचें उचित एकादश अभंग । महाफळ त्याग करूनि गेला ॥२॥ तुका म्हणे सेवा समर्पूनि पायीं । झालों उतराई ठावें असो ॥३॥