भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्ही विश्वनाथ । दीनरंक मी अनाथ

tumhi vishvanath | dinarank mi anath

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुम्ही विश्वनाथ । दीनरंक मी अनाथ ॥१॥ कृपा कराल ते थोडी । पायां पडिलों बराडी ॥ध्रु.॥ काय उणें तुम्हांपाशीं। मी तों अल्प चि संतोषी ॥२॥ तुका म्हणे देवा । कांहीं भातुकें पाठवा ॥३॥