भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्ही आम्ही भले आतां । जालों चिंता काशाची

tumhi amhi bhale atan | jalon chinta kashachi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुम्ही आम्ही भले आतां । जालों चिंता काशाची ॥१॥ आपुलाले आलों स्थळीं । मौन कळी वाढेना ॥ध्रु.॥ सहज जें मनीं होतें । तें उचितें घडलें ॥२॥ तुका म्हणे नसतें अंगा । येत संगा सारिखें ॥३॥