भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुका वेडा अविचार । करी बडबड फार

tuka veda avichar | kari badabad phar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुका वेडा अविचार । करी बडबड फार ॥१॥ नित्य वाचे हाचि छंद । राम कृष्ण हरी गोविंद ॥ध्रु.॥ धरी पांडुरंगीं भाव। आणीक नेणें दुजा देव ॥२॥ गुरुज्ञान सर्वा ठायीं । दुजें न विचारी कांहीं ॥३॥ बोल नाईके कोणाचे । कथे नागवा चि नाचे॥४॥ संगउपचारें कांटाळे । सुखें भलते ठायीं लोळे ॥५॥ कांहीं उपदेशिलें नेणे । वाचे विठ्ठल विठ्ठल म्हणे ॥६॥ केला बहुतीं फजित । तरी हें चि करी नित्य ॥७॥ अहो पंडितजन । तुका टाकावा थुंकोन ॥८॥