भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुका म्हणे सुख घेतलें गोपाळीं । नाचती कांबळीं करुनि ध्वजा

tuka mhane sukh ghetalen gopalin | nachati kambalin karuni dhvaja

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुका म्हणे सुख घेतलें गोपाळीं । नाचती कांबळीं करुनि ध्वजा ॥१॥ करूनियां टिरी आपुल्या मांदळ । वाजविती टाळ दगडाचे ॥२॥ दगडाचे टाळ कोण त्यांचा नाद । गीत गातां छंद ताल नाहीं ॥३॥ नाही ताळ गातां नाचतां गोपाळां । घननीळ सावळा तयामध्यें ॥४॥ मधीं जयां हरी तें सुख आगळें । देहभाव काळें नाहीं तयां ॥५॥ तयांसि आळंगी आपुलिया करीं । जाती भूमीवरी लोटांगणीं ॥६॥ निजभाव देखे जयांचिये अंगीं । तुका म्हणे संगीं क्रीडे तयां ॥७॥