भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुका म्हणे पुन्हा न येती मागुत्या । कृष्णासीं खेळतां दिवस गमे

tuka mhane punha na yeti magutya | krushnasin khelatan divas game

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुका म्हणे पुन्हा न येती मागुत्या । कृष्णासीं खेळतां दिवस गमे ॥१॥ दिवस राती कांहीं नाठवे तयांसी । पाहातां मुखासी कृष्णाचिया ॥२॥ याच्या मुखें नये डोळयासी वीट । राहिले हे नीट ताटस्थ चि ॥३॥ तटस्थ राहिलें सकळ शरीर । इंद्रियें व्यापार विसरलीं ॥४॥ विसरल्या तान भुक घर दार । नाहीं हा विचार आहों कोठें ॥५॥ कोठें असों कोण जाला वेळ काळ । नाठवे सकळ विसरल्या ॥६॥ विसरल्या आम्हीं कोणीये जातीच्या । वर्णा ही चहूंच्या एक जाल्या ॥७॥ एक जाल्या तेव्हां कृष्णाचिया सुखें । निःशंकें भातुकें खेळतील ॥८॥ खेळती भातुकें कृष्णाच्या सहित । नाहीं आशंकित त्यांचें चित्त ॥९॥ चित्ती तो गोविंद लटिकें दळण । करिती हें जन करी तैसें ॥१०॥ जन करी तैसा खेळतील खेळ । अवघा गोपाळ करूनियां ॥११॥ करिती आपला आवघा गोविंद । जना साच फंद लटिका त्या ॥१२॥ त्याणीं केला हरी सासुरें माहेर । बंधु हे कुमर दीर भावें ॥१३॥ भावना राहिली एकाचिये ठायीं । तुका म्हणे पायीं गोविंदाचे ॥१४॥