भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझी सेवा करीन मी मनोभावें वो

tujhi seva karin mi manobhaven vo

तुझी सेवा करीन मी मनोभावें वो । माझें मन गोविंदीं रंगलें वो ॥१॥ नवसिये नवसिये माझे नवसीयेवो ॥ पंढरिचे दैवते विठ्ठले नवसिये वो ॥२॥ बापरखुमादेवीवरे विठ्ठले वो । चित्तीं चैतन्य चोरुनि नेलें वो ॥३॥