भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझी गुण कीर्ति ऐकोनि आर्ते मन उचललें

tujhi gun kirti aikoni arte man uchalalen

तुझी गुण कीर्ति ऐकोनि आर्ते मन उचललें । आलिंगना धाविन्नले उताविळ ॥१॥ तनु मनु विगुंतले मन वाचा गुंतलें । मी माझें विसरले दर्शन गे माये ॥२॥ उतावेळपणें भुजदंड उचललें । नेणोनि ठकलें ठेले रुप पाहतांचि बाईये ॥३॥ पातिया पातें नलगे पाहणें तेंचि ठेलें । तैसें बापरखुमादेवीवर विठ्ठलें केलेगे माये ॥४॥