भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझा दास ऐसा म्हणती लोकपाळ । म्हणऊनि सांभाळ करीं माझा

tujha das aisa mhanati lokapal | mhanauni sambhal karin majha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुझा दास ऐसा म्हणती लोकपाळ । म्हणऊनि सांभाळ करीं माझा ॥१॥ अनाथाचा नाथ पतितपावन । हें आतां जतन करीं नाम ॥ध्रु.॥ माझें गुण दोष पाहातां न लगे अंत । ऐसें माझें चित्त मज ग्वाही ॥२॥ नेणें तुझी कैसी करावी हे सेवा । जाणसी तूं देवा अंतरींचें ॥३॥ तुका म्हणे तूं या कृपेचा सिंधु । तोडीं भवबंधु माझा देवा ॥४॥