भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुजविण येकली रे कृष्णा न गमे राती

tujavin yekali re krushna na game rati

तुजविण येकली रे कृष्णा न गमे राती । तव तुवां नवल केलें वेणू घेऊनि हातीं । आलिये तेंचि सोय तुझी वोळखिलें गती ॥१॥ नवल हें वालभरे कैसें जोडलें जिवा । दुसरें दुरी ठेलें प्रीति केला रिघावा ॥२॥ पारुरे पारुरे कान्हा झणे करिसी अव्हेरु । तूं तंव ह्रदयींचा होसी चैतन्य चोरु । बापरखुमादेवीवरा विठो करि कां अंगिकारु ॥३॥