भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुजसवे येतों हरी । आम्हां लाज नाहीं तरी । उचलिल्या गिरी । चंग तई वांचलो

tujasave yeton hari | amhan laj nahin tari | uchalilya giri | chang tai vanchalo

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुजसवे येतों हरी । आम्हां लाज नाहीं तरी । उचलिल्या गिरी । चंग तई वांचलो ॥१॥ मोडा आतां खेळ । गाई गेल्या झाला वेळ । फाकल्या ओढाळ । नाहीं तेच आवरा ॥ध्रु.॥ चांग दैवे यमुनेसी वांचलों बुडतां । निलाजिरीं आम्ही । नाहीं भय धाक या अनंता ॥२॥ खातों आगी माती । आतां पुरे हा सांगाती । भोंवतां भोंवेल। आम्हां वाटते हे चित्ती ॥३॥ तुका म्हणे उरी नाही तुजसवे । शाहाणिया दुरी छंदभोळीया भावें ॥४॥