भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुजमाजी विरावें तुज गिळूनि राहावें

tujamaji viraven tuj giluni rahaven

तुजमाजी विरावें तुज गिळूनि राहावें । तुझें रुप पाहावें रुपेंविण ॥१॥ तूंतें अवघें गुज म्यां सांगावें । वाचेविण बोलावें नि:शब्दाकारें ॥२॥ रखुमादेविवरु वाचे विनविला । प्रसन्न जाला ब्रह्म दाउनी ॥३॥