भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुजकरितां होतें आनाचें आन । तारिले पाषाण उदकीं देवा

tujakaritan hoten anachen an | tarile pashan udakin deva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुजकरितां होतें आनाचें आन । तारिले पाषाण उदकीं देवा ॥१॥ कां नये कैवार करूं अंगीकार । माझा बहु भार चड जाला ॥ध्रु.॥ चुकलासी म्हणों तरी जीवांचा ही जीव । रिता नाहीं ठाव उरों दिला ॥२॥ तुका म्हणे ऐसें काय सत्ताबळ । माझे परी कृपाळ आहां तुह्मी ॥३॥