भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुज पाहावें हे धरितों वासना । परि आचरणा ठाव नाहीं

tuj pahaven he dhariton vasana | pari acharana thav nahin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुज पाहावें हे धरितों वासना । परि आचरणा ठाव नाहीं ॥१॥ करिसी कैवार आपुलिया सत्ता । तरि च देखता होइन पाय ॥ध्रु.॥ बाहिरल्या वेषें उत्तम दंडीलें । भीतरी मुंडलें नाहीं तैसें ॥२॥ तुका म्हणे वांयां गेलों च मी आहे । जरि तुम्ही साह्य न व्हा देवा ॥३॥