भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुज करितां होत ऐसे । मूढ चतुर पंडित पिसे

tuj karitan hot aise | mudh chatur pandit pise

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुज करितां होत ऐसे । मूढ चतुर पंडित पिसे॥१॥ परि वर्म नेणे तें कोणी । पीडाखाणी भोगितील ॥ध्रु.॥ उल्लंघितें पांगुळ गिरी । मुकें करी अनुवाद ॥२॥ पापी होय पुण्यवंत । न करी घात दुर्जन ॥३॥ अवघें हेळामात्रें हरी । मुक्त करी ब्रम्हांड॥४॥ तुका म्हणे खेळे लीळा । पाही वेगळा व्यापूनि ॥५॥