भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुज जाणें तानें नाहीं पांडुरंगा । कां जी मज सांगा उपेक्षिलें

tuj janen tanen nahin panduranga | kan ji maj sanga upekshilen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुज जाणें तानें नाहीं पांडुरंगा । कां जी मज सांगा उपेक्षिलें ॥१॥ तुज ठावें होतें मी पातकी थोर । आधीं च कां थार दिधली पायीं ॥ध्रु.॥ अंक तो पडिला हरीचा मी दास । भेद पंगतीस करूं नये ॥२॥ तुका म्हणे आम्ही जिंतिलें तें खरें । आतां उणें पुरें तुम्हां लागीं ॥३॥