भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुज घालोनियां पूजितों संपुष्टीं । परि तुझ्या पोटीं चवदा भुवनें

tuj ghaloniyan pujiton sampushtin | pari tujhya potin chavada bhuvanen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुज घालोनियां पूजितों संपुष्टीं । परि तुझ्या पोटीं चवदा भुवनें ॥१॥ तुज नाचऊनि दाखवूं कौतुक । परी रूपरेखा नाहीं तुज ॥ध्रु.॥ तुजलागीं आम्ही गात असों गीत । परी तूं अतीत शब्दाहूनि ॥२॥ तुजलागीं आह्मीं घातियेल्या माळा । परि तूं वेगळा कर्तुत्वासी ॥३॥ तुका म्हणे आतां होऊनि परमित । माझें कांहीं हित विचारावें ॥४॥