भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुज चि पासाव जालोंसे निर्माण । असावें तें भिन्न कासयानें

tuj chi pasav jalonse nirman | asaven ten bhinna kasayanen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुज चि पासाव जालोंसे निर्माण । असावें तें भिन्न कासयानें ॥१॥ पाहावा जी ठायीं करूनि विचार । न्यून कोठें फार असे चि ना ॥ध्रु.॥ ठेविलिये ठायीं आज्ञेचें पाळण । करूनि जतन राहिलोंसें ॥२॥ तुका म्हणें आतां बोलतसें स्पष्ट । जालों क्रियानष्ट तुह्मा ऐसा ॥३॥