भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुज ऐसा कोण उदाराची रासी । आपुलेचि देसी पद दासा

tuj aisa kon udarachi rasi | apulechi desi pad dasa

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुज ऐसा कोण उदाराची रासी । आपुलेचि देसी पद दासा ॥१॥ शुद्ध हीन कांहीं न पाहासी कुळ । करिसी निर्मळ वास देहीं ॥२॥ भावें हें कदान्न खासी त्याचे घरीं । अभक्तांची परी नावडती ॥३॥ नवजासी जेथें दुरी दवडितां । न येसी जो चित्ता योगियांच्या ॥४॥ तुका म्हणे ऐसीं ब्रीदें तुझीं खरीं । बोलतील चारी वेद मुखें ॥५॥