भजनी मालिका
← भजनांकडे परत

तृषाकाळी उदक भेटी । पडे मिठी आवडीची

trushakali udak bheti | pade mithi avadichi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तृषाकाळी उदक भेटी । पडे मिठी आवडीची ॥१॥ ऐसियाचा बरवा संग । जिवलग संतांचा ॥ध्रु.॥ मिष्टान्नाचा योग भुके । म्हणतां चुके पुरेसें ॥२॥ तुका म्हणे माते बाळा । कळवळा भेटीचा ॥३॥