भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्राहे त्राहे त्राहे सोडवीं अनंता । लागों दे ममता तुझे पायीं

trahe trahe trahe sodavin ananta | lagon de mamata tujhe payin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
त्राहे त्राहे त्राहे सोडवीं अनंता । लागों दे ममता तुझे पायीं॥१॥ एक चि मागणें देई तुझी गोडी । न लगे आवडी आणिकाची ॥ध्रु.॥ तुझें नाम गुण वर्णीन पवाडे । आवडीच्या कोडें नाचों रंगीं ॥२॥ बापा विठ्ठलराया हें चि देई दान । जोडती चरण जेणें तुझे ॥३॥ आवडीसारखें मागितलें जरी । तुका म्हणे करीं समाधान ॥४॥