भजनी मालिका
← भजनांकडे परत

तोंवरी म्यां त्यास कैसें निषेधावें । जों नाहीं बरवें कळों आलें

tonvari myan tyas kaisen nishedhaven | jon nahin baraven kalon alen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तोंवरी म्यां त्यास कैसें निषेधावें । जों नाहीं बरवें कळों आलें ॥१॥ कोणाचिया मुखें तट नाहीं मागें । वचन वाउगें बोलों नये ॥ध्रु.॥ दिसे हानि परी निरास न घडे । हे तंव रोकडे अनुभव॥२॥ आपुलिया भोगें होइऩल उशीर । तोंवरी कां धीर केला नाहीं ॥३॥ तुका म्हणे गोड करील सेवट । पाहिली ते वाट ठायीं आहे ॥४॥