भजनी मालिका
← भजनांकडे परत

तोंडें बोलावें तें तरी वाटे खरें । जीव येरेयेरें वंचिजे ना

tonden bolaven ten tari vate kharen | jiv yereyeren vanchije na

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तोंडें बोलावें तें तरी वाटे खरें । जीव येरेयेरें वंचिजे ना ॥१॥ हें तुम्हां सांगणें काय उगवूनि । जावें समजोनि पांडुरंगा ॥ध्रु.॥ जेवित्याची खूण वाढित्या अंतरीं । प्रीतीनें हे धरी चाली तेथें ॥२॥ तुका म्हणे बहु परीचे आदर । अत्यंत वेव्हार संपादणी ॥३॥