भजनी मालिका
← भजनांकडे परत

तोंडे जाले संन्यासु

tonde jale sannyasu

तोंडे जाले संन्यासु । भोगावरी धावें हव्यासु ॥१॥ ते नेणती ब्रह्मरसु । वायां होति कासाविसु ॥२॥ ब्रह्मकर्मानें साधु जाती । वायां चुकली तुझी भक्ति ॥३॥ सर्वत्र आपणचि म्हणती । अभक्ष्य भक्षण करिती ॥४॥ तोडी दंभ माया धंदा । शरण रिघे रे गोविंदा ॥५॥ चुकले विठ्ठला उदारा । बापरखुमादेविवरा ॥६॥