भजनी मालिका
← भजनांकडे परत

तो आपुलिया चाडा कोटिगर्भवासां येतां

to apuliya chada kotigarbhavasan yetan

तो आपुलिया चाडा कोटिगर्भवासां येतां श्लोघिजे तुझिया गोमटेपणा पकडलो दातारा । हें बोलणें बोलतां लाजिजेजी सुंदरा ॥१॥ तुमतें देखिलिया हें मन मागुतें मोहरेना । वज्र द्रवे परि मन न द्रवे हाचि विस्मो पुढतु पुढती सुंदरा ॥२॥ ऐसें स्थावर जंगम व्यापिलें कीं आपुलें वालभ केलें तूंत देखिल्या त्रिगुणुपरे ऐसें कोणे निष्ठुरें घडविलेजी सुंदरा म्हणौनि तुज माजी विरावें कीं देवा तूंचि होऊनि राहावें । बापरखुमादेविवरा न बोलावे परि बोले हें स्वभावेंजी सुंदरा ॥४॥