भजनी मालिका
← भजनांकडे परत

तीर्थें केलीं कोटीवरी । नाहीं देखिली पंढरी

tirthen kelin kotivari | nahin dekhili pandhari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तीर्थें केलीं कोटीवरी । नाहीं देखिली पंढरी ॥१॥ जळो त्याचें ज्यालेंपण । न देखे चि समचरण ॥ध्रु.॥ योग याग अनंत केले । नाहीं समचरण देखिले ॥२॥ तुका म्हणे विठ्ठलपायीं। अनंत तीर्थे घडिलीं पाहीं ॥३॥