भजनी मालिका
← भजनांकडे परत

तीर्थाची अपेक्षा स्थळीं वाढे धर्म । जाणावें तें वर्म बहु पुण्य

tirthachi apeksha sthalin vadhe dharma | janaven ten varma bahu punya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तीर्थाची अपेक्षा स्थळीं वाढे धर्म । जाणावें तें वर्म बहु पुण्य ॥१॥ बहु बरी ऐसी भाविकांची जोडी । काळ नाहीं घडी जात वांयां ॥ध्रु.॥ करूनी चिंतन करवावें आणिकां । तो या जाला लोकां नाव जगीं ॥२॥ तुका म्हणे ऐसे परउपकारी । त्यांच्या पायांवरी डोई माझी ॥३॥