भजनी मालिका
← भजनांकडे परत

थोर ती गळाली पाहिजे अहंता । उपदेश घेतां सुख वाटे

thor ti galali pahije ahanta | upadesh ghetan sukh vate

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
थोर ती गळाली पाहिजे अहंता । उपदेश घेतां सुख वाटे ॥१॥ व्यर्थ भरावरी केलें पाठांतर । जोंवरी अंतर शुद्ध नाहीं ॥ध्रु.॥ घोडें काय थोडें वागवितें ओझें । भावेंविण तैसें पाठांतर ॥२॥ तुका म्हणे धरा निष्ठावंत भाव । जरी पंढरीराव पाहिजे तो॥३॥