भजनी मालिका
← भजनांकडे परत

थोकलें याच्या गुणीं तनुमनासहित

thokalen yachya gunin tanumanasahit

थोकलें याच्या गुणीं तनुमनासहित । त्या निजतत्त्वीं प्रीत निमालें वो माय ॥१॥ साहीं संवादले चौघे अनुवादले । पुरोनि उरलें म्या देखिले वो माय ॥२॥ कापुराची भांडुली परिमळें भरली । दीपीं उजळी रुप नासले वो माय ॥३॥ तेथें नाहीं ल्याया रुप ना छाया । ऐसी ज्योती कर्पूराची उजळल्या वो माय ॥४॥ तेथें नाहीं उरवणी एकला एकपणीं । देखतांचि नयनी उमळला वो माय ॥५॥ ऐसी जाली प्राप्ती खुंटली मागिल गती । रखूमादेवीपती जोडला वो माय ॥६॥