भजनी मालिका
← भजनांकडे परत

तेव्हां होतों भोगाधीन । तुम्हां भिन्न पासूनि

tevhan hoton bhogadhin | tumhan bhinna pasuni

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तेव्हां होतों भोगाधीन । तुम्हां भिन्न पासूनि ॥१॥ आतां बोलों नये ऐसें । आनारिसें वेगळें ॥ध्रु.॥ सन्मुख जालों स्वामीकडे । भव आंगडे निराळे ॥२॥ चिंतिलें तें चिंतामणी । फिटे धणी तों द्यावें ॥३॥ सहज स्थिती आहे अंगीं । प्रसंगीं ते वंचेना ॥४॥ तुमची देवा धरिली कास । केला नास प्रपंचा ॥५॥ तुका म्हणे जाणोनि वर्म । कर्माकर्में ठेविलीं ॥६॥