भजनी मालिका
← भजनांकडे परत

तेणें वेशें माझीं चोरिलीं अंगें । मानावया जग आत्पपणे । नाहीं चाड भीड संसाराचें कोड । उदासीन सर्व गुणें । भय मोह लज्जा निरसली शंका । अवघियां एक चि पणें । विठ्ठलाच्या पायीं बैसोनि राहिलीं । भागलीं नुटित तेणें

tenen veshen majhin chorilin angen | manavaya jag atpapane | nahin chad bhid sansarachen kod | udasin sarva gunen | bhay moh lajja nirasali shanka | avaghiyan ek chi panen | viththalachya payin baisoni rahilin | bhagalin nutit tenen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तेणें वेशें माझीं चोरिलीं अंगें । मानावया जग आत्पपणे । नाहीं चाड भीड संसाराचें कोड । उदासीन सर्व गुणें । भय मोह लज्जा निरसली शंका । अवघियां एक चि पणें । विठ्ठलाच्या पायीं बैसोनि राहिलीं । भागलीं नुटित तेणें ॥१॥ आतां त्यांसीं काय चाले माझें बळ । जालोंसें दुर्बळ सत्वहीन । दग्ध पट दिसे संगति बरवंट । काय त्याचें कारण ॥ध्रु.॥ आळसें दृष्टी न पाहे आपुलें । एक चि देखिलें सर्वरूप । मानामान तेथें खुंटोनि राहिलें । पिसुन तो कोण बाप । ज्योति ना अंधार अवघा एकंकार। तेथें काय पुण्यपाप । विठ्ठलावांचुनि कांहीं च नावडे । वेगळाल्या भावें रूप ॥२॥ बळबडिवार लौकिक वेव्हार । गेली आशा तृष्णा माया । सुखदुःखाची वार्ता नाइके । अंतरलों दुरी तया । मीतूंपणनिःकाम होऊनि । राहिलों आपुलिया ठायां । तुजविण आतां मज नाहीं कोणी । तुका म्हणे देवराया ॥३॥