भजनी मालिका
← भजनांकडे परत

तेणें सुखें माझें निवविलें अंग । विठ्ठल हें जग देखियेलें

tenen sukhen majhen nivavilen ang | viththal hen jag dekhiyelen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तेणें सुखें माझें निवविलें अंग । विठ्ठल हें जग देखियेलें ॥१॥ कवतुकें करुणा भाकीतसें लाडें । आवडी बोबडें बोलोनियां ॥ध्रु.॥ मज नाहीं दशा अंतरीं दुःखाची । भावना भेदाची सर्व गेली ॥२॥ तुका म्हणे सुख झालें माझ्या जीवा । रंगलो केशवा तुझ्या रंगे ॥३॥