भजनी मालिका
← भजनांकडे परत

तें हीं नव्हे जें करितां कांहीं । ध्यातां ध्यायीं तें ही नव्हे

ten hin navhe jen karitan kanhin | dhyatan dhyayin ten hi navhe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तें हीं नव्हे जें करितां कांहीं । ध्यातां ध्यायीं तें ही नव्हे ॥१॥ तें ही नव्हे जें जाणवी जना । वाटे मना तें नव्हे ॥ध्रु.॥ त्रास मानिजे कांटाळा । अशुभ वाचाळा तें ही नव्हे ॥२॥ तें ही नव्हे जें भोंवतें भोंवे । नागवें धांवे तें ही नव्हे ॥३॥ तुका म्हणे एक चि आहे । सहजिं पाहें सहज ॥४॥