भजनी मालिका
← भजनांकडे परत

ते माझे सोयरे सज्जन सांगाती । पाय आठविती विठोबाचे

te majhe soyare sajjan sangati | pay athaviti vithobache

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ते माझे सोयरे सज्जन सांगाती । पाय आठविती विठोबाचे ॥१॥ येरा मानी विधि पाळणापुरतें । देवाचीं तीं भूतें म्हणोनियां ॥ध्रु.॥ सर्वभावें झालों वैष्णवांचा दास । करीन त्यांच्या आस उच्छिष्टाची ॥२॥ तुका म्हणे जैसे मानती हरीदास । तैशी नाहीं आस आणिकांची ॥३॥