भजनी मालिका
← भजनांकडे परत

तपासी तें मन करूं पाहे घात । धरोनि सांगात इंद्रियांचा

tapasi ten man karun pahe ghat | dharoni sangat indriyancha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तपासी तें मन करूं पाहे घात । धरोनि सांगात इंद्रियांचा ॥१॥ म्हणोनि कीर्तन आवडलें मज । सांडोनियां लाज हें चि करी ॥ध्रु.॥ पाहातां आगमनिगमाचे ठाव । तेथें नाहीं भाव एकविध ॥२॥ तुका म्हणे येथें नाहीं वो विकार । नाम एक सार विठोबाचें ॥३॥