भजनी मालिका
← भजनांकडे परत

तन मन धन दिलें पंढरिराया । आतां सांगावया उरलें नाहीं

tan man dhan dilen pandhariraya | atan sangavaya uralen nahin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तन मन धन दिलें पंढरिराया । आतां सांगावया उरलें नाहीं ॥१॥ अर्थचाड चिंता नाहीं मनीं आशा । तोडियेला फांसा उपाधीचा ॥२॥ तुका म्हणे एक विठोबाचें नाम । आहे जवळी दाम नाहीं रुका ॥३॥