भजनी मालिका
← भजनांकडे परत

तांबगी हें नाणें न चले खऱ्या मोलें । जरी हिंडविलें देशोदेशीं

tambagi hen nanen na chale kharya molen | jari hindavilen deshodeshin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तांबगी हें नाणें न चले खऱ्या मोलें । जरी हिंडविलें देशोदेशीं ॥१॥ करणीचें कांहीं न मने सज्जना । यावें लागे मना वृद्धांचिया ॥ध्रु.॥ हिरियासारिका दिसे शिरगोळा । पारखी ते डोळां न पाहाती ॥२॥ देऊनियां भिंग कामाविलें मोतीं । पारखिया हातीं घेतां नये ॥३॥ तुका म्हणे काय नटोनियां व्यर्थ । आपुलें हें चित्त आपणा ग्वाही ॥४॥