भजनी मालिका
← भजनांकडे परत

तडामोडी करा । परि उत्तम तें भरा

tadamodi kara | pari uttam ten bhara

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तडामोडी करा । परि उत्तम तें भरा ॥१॥ जेणें खंडे एके खेपे । जाय तेथें लाभें वोपे ॥ध्रु.॥ दाविल्या सारिखें । मागें नसावें पारिखें ॥२॥ मागें पुढें ॠण । तुका म्हणे फिटे हीण ॥३॥