भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वयें पाक करी । संशय तोचि धरी । संदेहसागरीं । आणीक परी बुडती

svayen pak kari | sanshay tochi dhari | sandehasagarin | anik pari budati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
स्वयें पाक करी । संशय तोचि धरी । संदेहसागरीं । आणीक परी बुडती ॥१॥ जाणे विरळा एक । जालें तेथींचे हें सुख । देखिले बहुतेक । पुसतां वाट चुकले ॥ध्रु.॥ तोचि जाणे सोंवळें । शोधी विकल्पाचीं मुळें । नाचती पाल्हाळें । जे विटाळें कोंडिले ॥२॥ तोचि साधी संधी । सावध त्रिकाळ जो बुद्धी । संदेहाचा संधी। वेठी आणिक धरियेले ॥३॥ अखंड ते ध्यान । समबुद्धि समाधान । सोंग वांयांविण । ते झांकून बैसती ॥४॥ करणें जयासाठी । जो नातुडे कवणे आटी । तुका म्हणे साठी । चित्तवित्तेंवांचूनि ॥५॥